छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : हूल का दिली, असा जाब विचारताच रिक्षाचालकाने दुचाकीस्वार तीन तरुणांना बेल्ट, लाकडी दांड्याने मारहाण केली. ही घटना ५ फेब्रुवारीच्या रात्री ९ वाजता सिडको चौकात लेमन ट्री हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार हर्ष सुखदेव चव्हाण (२३, रा. जयभवानीनगर) यांच्या फिर्यादीवरून अजय गौतम दाभाडे, प्रज्वल विजय भंडारे, आकाश भाऊसाहेब निकाळजे (तिघे रा. आंबेडकरनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील अजय दाभाडे हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. आरोपींनी चव्हाणसह त्याचे मित्र आदित्य अहिरे व रोहित सोनवळे यांना मारहाण केली.














